सयाजी शिंदे यांनी साजरी केली “सावलीची वारी”
संगमनेर, दि. 3 – आषाढी एकादशी निमित्त सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे विशाल वृक्षाचे चे दर्शन घेऊन “सावलीची वारी” साजरी केली. आजूबाजूच्या परिसरात झाडे लावली.

“वृक्ष वेली आम्हा सोयरी वनचरे,”
“या नभाने या भुईला दान द्यावे, या मातीतून चैतन्य गावे.” या म्हणी प्रमाणे मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांनी सध्या वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडीसंदर्भात १२ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कामं हाती घेतली आहेत. झाडे लावणे, वाढवणे, त्यांचे संवर्धन करणे याचसोबत त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. वृक्ष बँक, वृक्ष सुंदरी पुरस्कार, निसर्गराजा पुरस्कार, सेल्फी विथ ट्री यांसारख्या उपक्रमांतून निसर्गाबद्दल जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. सयाजी शिंदे यांचे उपक्रम, झाडांबद्दलची आत्मीयता
यावर्षी कोरोणा मुळे आपल्या वारकऱ्यांना वारीला जाता आले नाही म्हणून आपण एक उपक्रम सुरू केला. सर्वांना आवाहन केले की एका ज्येष्ठ झाडाला नमस्कार करून मिठी मारावी आणि तो फोटो काढून आम्हाला पाठवा, तुम्हाला पांडुरंग त्या झाडात सापडेल कारण झाड हे आपल्याला सर्वात जास्त ऑक्सीजन देणारे आहे आणि तेही पिढ्यानपिढ्या. या फोटोच्या उपक्रमातून आपल्याला सर्वात ज्येष्ठ झाडांची माहिती मिळेल. अशा प्रत्येक जिल्ह्यातील दहा ज्येष्ठ झाडांचा आपण उत्सव साजरा करणार आहोत. हे ठिकाण तीर्थक्षेत्र करूया, कारण यापेक्षा ऑक्सीजन देणारे कोणीच नाहीये.
या वर्षात आपण देहु ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर पालखी मुक्कामाचे ठिकाणी झाडे लावली आहेत जी आपल्या वारकऱ्यांना सावली आणि ऑक्सीजन देतील.
आपण आपल्या जवळच्या जुन्या झाडाला मिठी मारून एक फोटो काढायचा आहे आणि तो त्याच्या ठिकाणासह सयाजी शिंदे सह्याद्री देवराई यांच्या 7972395655, 9096644671 या नंबरवर व्हाट्सअप करायचा आहे. या सर्व फोटोंचा डाटा एकत्र करण्यात येणार असून. प्रत्येक जिल्ह्यातील सर्वात जुन्या दहा झाडांचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.
