Monday, August 31, 2026
ENTERTAINMENT

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका ‘सरोज खान’ यांचं मुंबईत निधन

मुंबई, दि. 3 – बॉलिवूडला आणखी एक मोठा झटका बसला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर ‘सरोज खान’ यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं . त्या 71 वर्षांच्या होत्या. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मध्य रात्री त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे.

सरोज खान यांचा समावेश बॉलीवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शकांमध्ये होतो. त्यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांना नृत्याचे धडे दिले होते. कलाक्षेत्रातील योगदानासाठी सरोज खान यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.

सरोज खान यांचा जन्म किशनचंद संधू सिंह आणि नोनी संधू सिंह यांच्या घरात झाला. त्यांचे खरे नाव निर्मला किशनचंद्र संधू सिंह नागपाल होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले. तीन वर्षांच्या असताना त्यांनी चाइल्ड आर्टिस्ट श्यामा म्हणून डेब्यू केला होता.

सरोज खान यांचे लग्न केवळ १३ व्या वर्षी जाले. ४३ वर्षांचे डान्स मास्टर बी. सोहनलाल यांच्याशी इस्लाम कबूल करून लग्न केले. बी सोहनलाल याचे लग्न झाले होते. तसेच ते चार मुलांचे वडिलही होते

सरोज खान यांनी आपल्या लग्नाबद्दल एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मी शाळेत जात होती. मला नाही माहिती की लग्नाचं महत्त्व काय होतं. एके दिवशी मास्टर सोहनलाल यांनी गळ्यात एक धागा बांधला, त्यांना वाटलं की त्यांचे लग्न झाले आहे.

सरोज खान यांच्या लग्नात खूप अडचणी आल्या. सरोज खान यांना माहिती नव्हते की त्याचे पती यांचे पूर्वीच लग्न झाले आहे. मुलगा राजू खान यांच्या जन्मानंतर त्यांना या गोष्टीचा खुलासा झाला. तेव्हा त्या १४ वर्षांच्या होत्या. १९६५ मध्ये त्यांनी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पण त्याचा आठ महिन्यानंतर मृत्यू झाला.

सरोज खानच्या मुलांना त्यांच्या पतीने नाव देण्यास नकार दिला. यामुळे दोघे वेगळे झाले. सोहनलाल याना हार्ट अटॅक आल्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले. या दरम्यान, त्यांच्या मुलगी कुकूचा जन्म झाला. सरोज खान यांनी दोघांचे पालन पोषण एकट्यानेच केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading