आशी सिंगचा यास्मीनच्या भूमिकेत प्रवेश
सोनी सबवरील काल्पनिक मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘च्या नवीन एपिसोड्ससाठी सुरक्षितताविषयक खबरदारी घेत शूटिंगला सुरूवात झाली आहे. अलाद्दिन व त्याच्या जीनींच्या शक्तिशाली टोळीची क्लासिक कथा, बगदादमधील त्यांची रोमहर्षक साहसी कृत्ये आणि प्रमुख जोडी ‘अलास्मीन‘चा हृदयस्पर्शी रोमांस अशा परिपूर्ण संयोजनासह मालिकेने प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रिनवर खिळवून ठेवले आहे.

दीर्घकाळानंतर आता चाहते लवकरच सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘चे नवीन एपिसोड्स पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. या नवीन एपिसोड्समध्ये अभिनेत्री आशी सिंग मालिकेमध्ये प्रवेश करताना दिसणार आहे. ती शक्तिशाली व ग्लॅमरस सुल्ताना यास्मीनच्या भूमिकेत दिसणार आहे. नवीन प्रकल्पासाठी नुकतेच शूटिंगला सुरूवात केलेली आशी शूटिंगच्या पहिल्या दिवसाबाबत आणि सर्वांची लाडकी यास्मीनचा लुक व भूमिकेमध्ये सामावून जाण्याबाबत सांगत आहे.
यास्मीनची भूमिका साकारण्याबाबत बोलताना आशी सिंग म्हणाली, ”मला भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका सोनी सबची ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा‘ मालिकचा भाग होण्याचा आनंद होत आहे. प्रत्येक मुलीचे राजकुमारी बनण्याचे स्वप्न असते आणि ही भूमिका माझी ती इच्छा पूर्ण करते. माझ्यासाठी हा मोठा बदल असल्यामुळे मी काहीशी नर्व्हस देखील आहे. पण मी आव्हानांवर खरे उतरत यास्मीनच्या भूमिकेत माझा सर्वोत्तम अभिनय सादर करण्यासाठी सज्ज आहे. मी यापूर्वी कधीच राजकुमारीची भूमिका साकारलेली नाही आणि यास्मीनच्या ग्लॅमरस लुकमध्ये सामावून जाण्यास मी खूपच उत्सुक आहे. मी भूमिकेसाठी तयारी करत आहे आणि बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहे. ज्यामुळे मी माझ्या अभिनयामधून यास्मीनच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन. ही भूमिका माझ्यासाठी नवीन व उत्साहवर्धक आहे आणि मी यासारखी भूमिका यापूर्वी साकारलेली नाही.”
सेटवरील सुरक्षा व सुरक्षितताविषयक उपायांबाबत बोलताना आशी म्हणाली, ”मी नुकतेच शूटिंगला सुरूवात केली आहे. या अनिश्चित काळादरम्यान प्रत्येकाच्या सुरक्षिततेच्या खात्रीसाठी सेटवर खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत. मी सेटवर प्रवेश करताच क्षणी मला घेण्यात आलेले विविध उपाय दिसले. प्रत्येकाला स्वत:चे आणि त्यांच्या वस्तूंचे सॅनिटायझेशन करण्याची सुविधा करण्यात आली आहे. नियमित कालांतराने सर्व परिसर सॅनिटाईज करण्यात येतो आणि संपूर्ण प्रॉडक्शन टीम सेफ्टी गिअर्स परिधान करत आहे. यास्मीनच्या भूमिकेतील पहिला दिवस घटनापूर्ण राहिला आहे आणि मी आशा करते की, प्रेक्षक व चाहते या नवीन प्रवासामध्ये मला पाठिंबा देतील.”
