Sunday, October 25, 2026
PUNE

पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोच्या वतीने डॉक्टर्स दिनानिमित्त पिपीई किटस प्रदान

पुणे, दि. 2 – डॉक्टर्स दिना निमित्त पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनच्या वतीने पुना हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना ५० पिपीई किट प्रदान करण्यात आले.संस्थेच्या यादव भवन येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष शरद सूर्यवंशी,माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे,उपाध्यक्ष विलास आहेरकर,स्पोर्ट्स कमिटीचे उमेश दांगट,माजी उपाध्यक्ष मनोज चितळीकर,अनिरुद्ध चव्हाण,विनोद रहाटे,प्रणव शेठ,स्वप्नील शहा,पुना हॉस्पिटलचे डॉ.हिमांशु खारकर(व्यवस्थापक), नरेश दवे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी बोलतांना शरद सूर्यवंशी व नरेंद्र सोनवणे यांनी या करोना महामारीच्या काळात डॉक्टर्स मोलाची कामगिरी बजावत आहेत त्यांचा डॉक्टर्स दिनानिमित्त सत्कार महत्वाचा आहे असे संगितले. डॉ.हिमांशु शहा यांनी मास्कचा नेहमी वापर महत्वाचा असून त्याने बराच बचाव होतो असे संगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading