fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

‘डॉक्टर्स डे’ निमित्त श्रीयश गार्डन सोसायटीत ‘डाॕक्टरांचा सन्मान

पुणे, दि. 1 – कोविंड १९ अर्थात कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर, नर्स आणि त्यांचे सहकारी कर्मचारी आपल्या जिवाची परवा न करता समाजाचे रक्षक झालेले आहेत. सध्याचे व्हायरस युद्ध भयानक आहे. श्रीयश गार्डन गृहनिर्माण सोसायटी, धनकवडी, पुणे यांच्या वतीने आज ‘आंतरराष्ट्रीय डॉक्टर दिना’ निमित्त सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांचा पुष्पगुच्छ पुस्तक व टाळ्या वाजवून सन्मान करण्यात आला. कारण हे आमचे कुटुंब आहे.

श्रीयश गार्डन गृहनिर्माण सोसायटी पोलिस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार व घर कामगार यांचा संकटाच्या काळात सुद्धा सर्वोच्च सन्मान करत आलेली आहे. राज्यसरकार व पुणे मनपा यांनी घालून दिलेले सर्व नियम, अटी शर्ती व नागरिकांची ‘सुरक्षा’ यांचे काटेकोर पालन करत आहे. सर्वांची सुरक्षा आणि इतरांची सेवा हाच सर्वोच्च मानबिंदू आहे. याउलट सोसायटी सर्वांना सोबत घेऊन गरजूंना मदत करते आहे.

‘सध्या मीच माझा रक्षक आहे. परंतु आम्ही आमचे रक्षक झालो तर आपण कोरोना व्हायरस ला हरवू शकतो. ही संघटित ताकत आपल्या सर्वांमध्ये असली पाहिजे. कारण माणसाच्या जगण्याला सर्वोच्च प्राधान्य आपण दिले पाहिजे आपण सर्वजण एकत्र होऊन कोरोनाला हरवू या…’

श्रीयश गार्डन सोसायटीचे अध्यक्ष धनंजय दिवाकर व सेक्रेटरी संतोष शिंदे यांच्या हस्ते सर्व सर्वश्री. डॉ. दत्तात्रय शिंदे, डाॕ. धनाजी पाटील, डाॕ. मुग्धा दिवाकर, डाॕ. राजेश्वरी औटी व चार्टर्ड अकाऊंटंट मा. संजय सुर्यवंशी, स्वप्नाली देशपांडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी… राजू रणदिवे, शशिकांत पवार, बिचकर सर, राजू मोमीन, संजय टिळेकर, अशोक जगताप, सचिन गायकवाड, विजय पुंडलिक, दिलीप सप्रे, दीपक कडेकर, रूषिकेश मुकनाक, अविनाश गावडे, रविंद्र औटी, प्रकाश खंदारे, श्री कुलकर्णी, अविनाश परबाळे आदी उपस्थित होते. यांनी सूत्रसंचालन सावकार डोंगरे यांनी केले तर धनंजय दिवाकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading