Saturday, June 20, 2026
PUNE

आषाढीनिमित्त शहरातील ५१ विठ्ठल मंदिरांच्या प्रमुखांचा सत्कार; हरित वारी अभियानाचा शुभारंभ

पुणे, दि. 30 – आषाढ़ी एकादशीच्या निमित्ताने आम्ही पुणेकर व श्री लिम्बराज महाराज ट्रस्ट ह्यांच्या वतीने पुणे शहरातील ५१ विठ्ठल मंदिरांच्या प्रमुखांचा सत्कार आणि हरित वारी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. बाजीराव रस्त्यावरील श्री लिम्बराज महाराज विठ्ठल मंदिरात हरित वारी शुभारंभ करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पं. वसंतराव गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, लिम्बराज महाराज ट्रस्टचे अखिल झांझले, निर्मल वारीचे प्रणव पवार, भारतीय वारकरी मंडलचे अध्यक्ष संदीप वळसे उपस्थित होते. पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे हे आॅनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

शिवाजी महाराज मोरे म्हणाले, या वेळची आषाढी ही न भूतो न भविष्यती अशी आहे. कोरोना महामारीमुळे अत्यंत मर्यादित स्वरुपात परंपरा राखून आपण एकत्र न येता आषाढ़ी एकादशी साजरी करत आहोत. आगामी काळात पुण्यातील सर्व विठ्ठल मंदिरांनी एकत्र येऊन पुणे शहरात हरितवारी उपक्रम जोमाने राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच साडेसातशे वर्षाहून अधिक काळाची परंपरा असलेली पंढरपुर वारी ही कालातीत असल्याचे प्रतिपादन वसंतराव गाडगीळ ह्यांनी व्यक्त केले. यावेळी तुळशीच्या रोपाला पाणी घालून हरितवारी उपक्रमाची सुरवात करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ५१ विठ्ठल मंदिरांच्या प्रमुखांना ठराविक वेळ घेऊन धान्याचे किट, भगवत गीता प्रत, तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. लिम्बराज महाराज मंदिरांच्या शोभेच्या कमानीचे उद्घाटन स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक राजेश येनपुरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading