Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडी उलटली

नवी मुंबई, दि. 29 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलेटिंग मोटार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी उलटली. यामध्ये एकाला किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजचा दिवस हा अपघाती दिवस बनला आहे. सकाळी खोपोली शहर‍च्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते. याठिकाणी झालेली अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृत‍ांजन पुलाच्या खाली पोलीस व्हॅन पलटी झाली.

शरद पवार यांचा ताफा आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅन क्र. (एमएच 12 एनयु 5881) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यात पलटी झाली. महामार्गावरील देवदूत पथक व खंडाळा महामार्ग पोलिसांनी तात्काळ गाडीमधील चालक व किरकोळ मार लागलेल्या पोलीस कर्मचार्‍यावर प्राथमिक उपचार करत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading