Saturday, June 20, 2026
MAHARASHTRA

कोरोना – राज्यात सलग चौथ्या दिवशी ५ हजारांहून अधिक कोरोना बाधित, तब्बल १८१ मृत्यू

पुण्यात ६१७ नवीन रुग्ण, ५ मृत्यू

मुंबई, दि.२९: राज्यात आज कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८८ हजार ९६० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ४३ हजार ४८५ नमुन्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८३ नमुने पॉझिटिव्ह (१८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७४ हजार  ९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १८१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ७८ मृत्यू हे मुंबई मनपा-२१, ठाणे-२, ठाणे मनपा-२, नवी मुंबई मनपा -१, भिवंडी निजामपूर मनपा-१, मीरा भाईंदर मनपा -४, मालेगाव मनपा-१, जळगाव-१,जळगाव मनपा-२, पुणे-१, पुणे मनपा-२०, पिंपरी चिंचवड मनपा -२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-६, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-६, उस्मानाबाद-१, अमरावती मनपा-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

२९ जून पुण्यातील करोना रुग्ण स्थिती

  • दिवसभरात ६१७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ४८२
  • बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
    एकूण रुग्ण – ९९२९
  • आज दिवसभरातील एकूण मृत्यू – ५
  • पुण्यातील एकूण मृत्यू – ६१७
  • शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ३३३
  • व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ६१
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – १६७४२
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ६१९५
  • आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ४०३८

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading