Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

आज पुण्यात ५३१ तर राज्यात ४ हजार ८४१ नवीन कोरोनाबाधित तर १९२ मृत्यू

३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२५: राज्यात आज ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार  ४५३ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के एवढे झाले आहे. आज कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी १ लाख ४७ हजार ७४१ नमुने पॉझिटिव्ह (१७.४२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५६ हजार  ४२८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी १०९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर  ४.६९ टक्के एवढा आहे.

२५   जून  पुण्यातील करोना रुग्ण स्थिती ……….- दिवसभरात ५३१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – २०२- बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे एकूण रुग्ण – ८३०२-  आज दिवसभरातील एकूण मृत्यू – १३- पुण्यातील एकूण मृत्यू – ५४५-  शहारतील एकूण गंभीर रुग्ण – २५३-  व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – ६३- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – १४१८५- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ५३२५-  आजच्या घेतलेल्या  एकूण चाचण्या- ३४५३

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading