fbpx

राखी सावंत म्हणतेय सुशांत माझ्या पोटी जन्माला येणार

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या धक्क्कयातून अजून त्याचे चाहते सावरले नसतानाच ड्रामाक्वीन राखी सावंत हीने अजब दावा करत खळबळ उडवली आहे. सुशांत आपल्या स्वप्नात आला होता व तो पुनर्जन्म घेणार असून आपल्या पोटी जन्माला येणार असल्याचे राखीने म्हटले आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने हा दावा केला आहे.

या व्हिडीओमध्ये राखीने रात्री स्वप्नात सुशांत सिंह राजपूत आल्याचे सांगितले आहे. झोपेत असताना रात्री अचानक झटका बसला. मी दचकून कोण आहे असे विचारताच मी सुशांत आहे असं तो म्हणाला. तसंच माझ्या चाहत्यांना सांग की पुन्हा जन्माला येणार आहे. यावर मी कसे काय विचारताच तो लवकरच सांगतो म्हणाला. पण मी आताच सांग म्हणताच त्याने राखी तू लग्न करशील तेव्हा तुझ्या पोटी मी जन्म घेणार असल्याचं सुशांतने सांगितल्याचे राखीने या व्हिडीओत म्हटले आहे. राखीच्या या अजब दाव्याने सुशांतचे चाहते मात्र भडकले असून त्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. काहीजणांनी तिला तू स्वस्तातले ड्रग्ज घेतलंयस का विचारलं आहे. तर काहीजणांनी अशा परिस्थितीतही तूझे हे नाटक बघून तू मनातून उतरल्याचे म्हणत राखीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: