fbpx

मागासवर्गीयांवरील हल्ले,कधी होणार कारवाई, वंचितच्यावतीने आंदोलनला सुरवात

मुंबई, दि. २० – राज्यातील मागासवर्गीयांवरील वाढते हल्ले पाहता प्रशासनाने अद्यापही ठोस पावले उचललेली नाहीत, राज्यभर निवेदने देऊन तीन दिवस झाले, मात्र कारवाई व योग्य तपासाला सुरुवात न झाल्याने वंचित बहुजन आघाडी अनुशक्तीनगर विभागाच्यावतीने उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.

मागासवर्गीयांनवरील हल्ले वाढत असून योग्य ती कारवाई केली जात नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरोपींना पाठीशी घालण्यात येत असून व योग्य ती कारवाई होत नसल्याने राज्यभर तीव्र आंदोलन करीत सरकार विरोधात निवेदन देण्यात आले होते. असे असतानाही अद्याप कारवाईला सुरुवात न झाल्याने किमान तशी घोषणाही न केल्याने वंचितच्यावतीने जाब विचारो आंदोलन करण्यात आले. अनुशक्तीनगर विभागाचे अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे,सुनीता डोळस, मकरंद कांबळे, कविता, दगडू साळवे,भाऊसाहेब जाधव, राणी अब्दुल्ले या कार्यकर्त्यानी उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन सरकारला जाब विचारला आहे. धर्मवादी, जातीयवादी असलेले हे सरकार जोपर्यंत निःपक्षपातीपणे कारवाई करायला सुरुवात करीत नाही, तोपर्यंत राज्यभर आंदोलन करून सरकारला जाब विचारला जाईल,असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला होता. त्यानुसार राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: