fbpx

द युनिक अॅकॅडमीचे प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

पुणे, दि. १९ – कोरोनामुळे लांबणीवर पडलेला एमपीएससीचा बहुप्रतिक्षित अंतीम निकाल अखेर घोषीत झाला. युनिक अॅकॅडमीमधून मार्गदर्शन घेतलेल्या दोनशेहून जास्त विद्यार्थ्यांनी एमपीएससी निकालात अंतीम यश मिळविले आहे. अकॅडमीचे चौगुले प्रसाद बसवेश्वर हे राज्यात सर्वसाधारण प्रवर्गात पहिले आले आहेत गणेश खताळे हे ओबीसी प्रवर्गात प्रथम तर श्रृतिषा पाठाडे या एसईबीसी प्रवर्गात प्रथम आल्या आहेत. युनिक अॅकॅडमीने नेहमीप्रमाणे सर्वच स्पर्धा परीक्षेतील आपली यशाची परंपरा राज्यसेवेच्या या परीक्षेतही कायम राखली आहे. ‘अभ्यास ते अधिकारी या वाटचालीत विद्यार्थीकेंद्रित परिपूर्ण मार्गदर्शन’ अशी आपली ओळख महाराष्ट्रात निर्माण केलेल्या ‘द युनिक अॅकॅडमीने नेहमीच विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सर्व टप्प्यावर व्यक्तिगत मार्गदर्शन केले आहे. अनुभवी व विषय तज्ज्ञ अध्यापक, आयोगाच्या धर्तीवरच्या टेस्ट सिरीज व सोबत त्याचे विश्लेषण, विद्यार्थी-अध्यापक समूह चर्चा गट, वर्षभर विविध विषयांवरचे सेमिनार्स, प्रशासनातील अनुभवी आणि रचनात्मक काम उभारलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शनासाठी थेट क्लासरूम भेटीचे उपक्रम, आयोगाच्या वातावरण निर्मितीतील मॉक इंटरव्ह्यू व त्यावर चर्चा आणि उपाययोजना, सर्व विषयांच्या अद्ययावत नोट्स व अनुभवी लेखकांची परीक्षाभिमुख पुस्तके यांसारखे उपक्रम द युनिक अॅकॅडमीच्या वतीने वर्षभर राबविले जातात. विद्यार्थ्यांचे आपल्या ध्येयावर लक्ष अधिक केंद्रित व्हावे आणि त्याचा अधिकारी पदाचा प्रवास सहजसुलभ व्हावा, यासाठी व्यक्तिगत विशेष सहकार्य केले जाते. यशवंत विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडीबद्दल द युनिक अकॅडमीचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एकूण ४२० अधिकारी पदांसाठी, दि. १३ ते १५ जुलै २०१९ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०१९चा अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. . आयोगातर्फे ४२० पदांसाठी राज्यसेवा पूर्वपरीक्षा फेब्रुवारी २०१९मध्ये राज्यातील ३७ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. पूर्व परीक्षेमधून राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता ६८२५ विद्यार्थी अहर्ताप्राप्त ठरले होते. जुलै २०१९ रोजी आयोगामार्फत राज्यातील मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या केंद्रांवर घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: