Sunday, June 21, 2026
PUNE

ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

पुणे, दि. 24 – साहित्यिक आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ विधीज्ञ ॲड. भास्करराव आव्हाड यांचे आज निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्यामागे ॲड. अविनाश आव्हाड व दोन मुली, पत्नी व बंधू ॲड. सुधाकर आव्हाड व पुतणे असा परिवार आहे.

भास्करराव आव्हाड यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राज्यातील शेकडो न्यायाधीश तयार करण्यात तसेच वकिलांना मार्गदर्शन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. अनेक वृत्तपत्रांत त्यांचे वैशिष्ठयपूर्ण लेख प्रकाशित झाले होते. मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते. लॉकडाऊनदरम्यान त्यांनी हजारो वकिलांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने विधी क्षेत्रातील दिग्गज हरपला, अशीच प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading