कोरोना – शुक्रवारी पुण्यात 1 हजार 705 नवे रुग्ण; 11 मृत्यू
पुणे, दि. 17 – पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आढळून येत आहे. दोन दिवसात तब्बल 3 हजार 288 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी दिसभरात 1 हजार 705 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 773 जण कोरोनामुक्त झाले, असुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर मागील चोविस तासात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात विविध रुग्णालयात 12 हजार 16 रुग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या 34 हजार 40 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य विभाच्या वतीने देण्यात आली.

– दिवसभरात १७०५ (ॲंटिजेन किटद्वारे-८५०) पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ७७३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात ११ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– ५२७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ८२ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३४०४०.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२०१६.
– एकूण मृत्यू -९१७.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- २११०७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४०११ आणि ॲंटिजेन किटद्वारे २८००- एकूण- ६८११
