कोरोना – राज्यात आज ६ हजार ७४१ नवीन रुग्ण; २१३ मृत्यू
पुणे – दिवसभरा ७५० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
मुंबई, दि.१४: राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २१३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८, रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२, जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१, परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
१४ जुलै पुण्यातील करोना रुग्ण स्थिती
पुण्यात रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले
- दिवसभरा ७५० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात घरी सोडलेले रुग्ण – ७२८
- बरे होऊन घरी सोडलेले आता पर्यतचे
एकूण रुग्ण – १८८२४ - आज दिवसभरातील एकूण मृत्यू – २५ ( ८ मृत्यू पुण्याबाहेरील रुग्ण)
- पुण्यातील एकूण मृत्यू – ८७४
- शहारतील एकूण गंभीर रुग्ण – ५१३
- व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेले रुग्ण – १९८
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – २९१०७
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – ९४०९
- आजच्या घेतलेल्या एकूण चाचण्या- ३८२० + १९२९ रॅपिड टेस्ट
