पुणे महापालिका : भाजपच्या काळातील कामाची ‘कॅग’मार्फत चौकशी व्हावी शिवसेनेची मागणी
पुणे : भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज पुणे महापालिकेच्या येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार सचिन अहिर यांनी केले.
या आंदोलनाला शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेविका संगीता ठोसर,यांनी शिवसेनेचे गजानन थरकुडे, किशोर
राजपूत, युवराज पारिक, तानाजी लोकरे, आबा कुंभारकर, कल्पना थोरवे, सविता मते, सीमा गायकवाड, श्रुती नाजीरकर, विजय जोरी, भरत आबा कुंभारकर, बाळकृष्ण वांजळे, योगेश पवार, सचिन मोहिते,संगीता ठोसर, विजया मोहिते
पुणे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन अहिर म्हणाले, पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत चौकशी यासाठी मागणी केली.
गेल्या पाच वर्षात पुणे महाापलिकेत विकास कामांच्या अनेक योजना आल्या. मात्र, त्यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. या कामांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सचिन अहिर यांनी केला. स्मार्ट सिटी, जायकाचा नदी सुधार प्रकल्पासारख्या योजना योग्यरित्या मार्गी लागू शकल्या नाहीत, असा सचिन अहिर यांनी केला.
