Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

शिवसेनेत गेलेले हाके अजून आयोगावर कसे? तातडीने हकालपट्टी करा, विक्रम ढोणे यांची मागणी

पुणेः महाविकास आघाडीच्या काळात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोगस प्राध्यापक असलेल्या लक्ष्मण हाके यांची राज्य मागासवर्ग आयोगावर नियुक्ती करून त्यांचे संरक्षण केले. आता हाके यांनी वडेट्टीवार यांना टांग मारून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आयोगाच्या पदावर असताना त्यांनी थेट राजकीय काम सुरू केले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याप्रकरणी हाके यांची तातडीने हकालपट्टी करून आयोगाचे गांभीर्य जपावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सुनील औंधकर,दिगंबर चव्हाण आदी उपस्थित होते.

ढोणे म्हणाले की, १५ जून २०२१ ला आयोग गठीत झाल्यापासून सदस्यांची पात्रता, आोबीसी डेटासंबंधी आम्ही वेळोवेळी भुमिका मांडली आहे. कोणतीही पात्रता पडताळणी न करता सदस्य नेमले गेले आहेत. लक्ष्मण हाके यांच्याकडे कोणतीही पात्रता नाही. त्यांनी चुकीची माहिती शासनाला देऊन तत्कालिन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून पद मिळवले होते. हाके हे बोगस प्राध्यापक असल्याचे, तसेच त्यांनी पीएचडी बाबतची खोटी माहिती दिल्याची लेखी तक्रार आम्ही केली होती. मात्र त्यात वडेट्टीवार यांनी हाके यांचे संरक्षण केले. आता सत्ताबदल होताच हाके यांनी आयोगाच्या पदाचे नाव सांगून पोरखेळ आरंभला आहे.

घटनात्मक आयोगाचे लाभ घेत असतानाच शिवसेना पक्षात प्रवेश करून त्यांचा प्रसार सुरू केला आहे. आयोगाचे सदस्य म्हणून केला जात असलेला हा प्रकार कायद्याच्या विरोधातला आहे. त्याबरोबरच आयोगाच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारा आहे. त्यामुळे एकाचवेळी हाके हे आयोगाचे सदस्य आणि शिवसेनेच कार्यकर्ते कसे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यामुळे हाके यांच्या एकूण कारभाराची, तसेच राजकीय घडामोडींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगु़डे यांच्याकडे केल्याचे ढोँणे यांनी सांगितले.

राज्य मागासवर्ग आयोगाला निधी देणे, तसेच सक्षमीकरणासाठी यापुर्वी पुण्यात आंदोलन केले होते. आता अपात्र सदस्यांना हाकलावे, शासनाची फसवणूक करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी गणेशोत्सवानंतर पुण्यातील आयोगासमोर आंदोलन करणार असल्याचे ढोणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading