Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निराधार विद्यार्थ्यांना पुणेकरांतर्फे सायकलींचे वाटप

पुणे – व्हील फॉर एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निराधार,अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्था व आम्ही पुणेकर संस्थेतर्फे जिल्हा परिषद शाळेत ५० सायकलींचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला गटविकास अधिकारी महादेव जायभाये, गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद धायगुडे, भीमाबाई कासट आदी उपस्थित होते.

सायकल वाटपाचा हा पहिला टप्पा असून येत्या नवरात्र उत्सवात दुसऱ्या टप्प्यातील सायकलींचे वाटप करणार असल्याचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी सांगितले.ज्या विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे त्यातील तेरा लाभार्थी या मुली आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका मुलींच्या जन्मदरात रेड झोन मध्ये असताना विविध सामाजिक संस्थांनी केलेल्या कामगिरीमुळे मुलींचा जन्मदर सुधारण्यासाठी मदत झाली होती. अशा ग्रामीण भागात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली हे आमचं भाग्य असल्याची भावना आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आली.

ज्या शाळेत शिक्षण घेतले आहे त्या शाळेतील निराधार विद्यार्थ्यांना मदत द्यायला मिळतेय हे आमचे भाग्य आहे.जन्मभूमीतील विद्यार्थ्यांसाठी आपण काही देणं लागतो, या भावनेतून आणि सामाजिक बांधिलकीतुन आपण या भागातील विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे कासट परिवारातर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading