Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

अजिंक्य सोशल फौंडेशन कडून महिलासाठी आरोग्य शिबीर

पुणे – भारतीय स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव निमित्ताने अजिंक्य सोशल फौंऊडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलासाठी वाकड येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्ष समाजसेविका जगदेवी घोडके होत्या. यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचारी यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी. त्यात वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी विविध प्रकारच्या मानसिक, शारिरीक समस्यायावर मार्गदर्शन केले. यावेळी ४० महिला उपस्थिताना संस्थेच्या माध्यमातून सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिन पवार यांनी संस्थेचे प्रस्ता केले. यावेळी संगीता भालेराव,संगीता पाटोळे,संगीता गोवंडे ,बाळासाहेब राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली करपे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading