येणाऱ्या निवडणूकीत भाजप व शिंदे गटाला गाडून संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचा झेंडा फडकणार -चंद्रशेखर घाडगे
पुणे: महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात नव्या राजकीय समीकरणाच्या नांदीची सुरूवात होत आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या राजकीय पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उपस्थित होते. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रशेखर घाडगे म्हणाले,पुरूषोत्तम खेडेकर साहेब यांची संभाजी ब्रिगेड प्रबोधनकार ठाकरे यांच्या शिवसेने सोबत एकत्र आली. हा वैचारिक विचारांचा विजय आहे. येणाऱ्या निवडणूकीत भाजप व शिंदे गटाला गाडून उद्धवसाहेब ठाकरे व मनोजदादा आखरे,सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड व शिवसेना युतीचा झेंडा फडकणार आहे, प्रादेशिक पक्षांना संपवायला निघालेल्या भाजपला येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून संभाजी ब्रिगेड व शिवसेनेची ताकत फडणवीस व बावनकुळे यांना दाखवणार आहोत. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी दिला आहे.
