Tuesday, May 5, 2026
Latest NewsNATIONALSports

अल्टिमेट खो खो आणि कबड्डीतील खेळाडूंचा भारतीय खेळांना पाठिंब्यासाठी निर्धार

पुणे :   पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत गुजरात जयंट्स संघाने तेलगु योद्धाज संघांचा 51-48 असा केवळ तीन गुणांच्या फरकाने रोमांचकारी पराभव करताना आगेकूच कायम राखली. ओडिशा जगरनट्स संघाने राजस्थान वॉरियर्स संघाला 6गुणांच्या फरकाने पराभुत करून प्रथमच गुण तालिकेत अग्रस्थानी झेप घेतली. ओडिशा ससंघाने हा सामना 51-45 असा जिंकताना या मौसमातील पाचचव्या विजयाची नोंद केली. त्याउलट राजस्थानचा हा सलग सहावा पराभव ठरला. ओडिशा संघाचे आता 15 गुण झाले असून त्यांनी तेलगु योद्धाज(12गुण) संघाला दुसऱ्या क्रमांकावर ढकलून पाहिले स्थान मिळवले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सामन्यात पी शिवरेड्डी याने संरक्षणात 3मिनिटे 18 सेकंद तर आक्रमणात 3 गुण नोंदवताना गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार रंजन शेट्टी आणि अभिनंदन पाटील यांनी प्रत्येकी 9 गुणांची नोंद करताना त्याला उत्कृष्ट साथ दिली.
दिवसातील अत्यंत चुरशीच्या सामन्यात गुजरात जयंट्स आणि तेलगु योद्धाज या दोन सर्वोत्तम संघांमध्ये पहिल्या डावा अखेर 27-27 अशी बरोबरी झाली होती. तिसऱ्या सत्रात शिवा रेड्डीने 3मिनिटे 18 सेकंद संरक्षण करूनही तेलगु योद्धाजने गुजरात जायंट्सवर 46-31 अशी आघाडी मिळवली. अखेरच्या सात मिनिटात गुजरात संघ 46-48 असा पिछाडीवर असताना शिवा रेड्डीने तीन महत्त्वाचे गुण मिळवून आपल्या संघाला वर्चस्व मिळवून दिले. हे वर्चस्व कायम राखताना गुजरात संघाने तेलगु योद्धाजवर निसटता विजय मिळवला.
भारतातील सर्वोत्तम चार कबड्डी पटूनपैकी एक नितेश कुमार याने गुरुवारी अल्टिमेट खो खो लीग मधील सामन्याला हजेरी लावून अस्सल भारतीय खेळांना पाठिंबा देण्यासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला.
लीग पद्धतीच्या व्यावसायिक स्पर्धांना 2014 मध्ये प्रारंभ झाल्यानंतर कबड्डी ने अनेक लोकप्रिय खेळांमध्ये स्थान मिळवले आणि आता कबड्डी प्रमाणेच भारतीय मातीतील खेळ असलेल्या खो खो ला अल्टिमेट खो खो लीगच्या पदार्पणानंतर आणखी एक लोकप्रिय भारतीय खेळ म्हणून मान्यता मिळत आहे.
अल्टिमेट खो खो स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लीग आयुक्त तेंझिंग नियोगी म्हणाले की, कबड्डी आणि खो खो हे दोन्ही खेळ एकत्रितपणे पुढे येताना पाहणे अभिमानाचे आहे. या दोन्ही खेळांनी मातीतून मॅट पर्यंतचा प्रवास यशस्वी केला असून या दोन्ही खेळातील खेळाडूंना आता प्रचंड लोकप्रियता मिळत असल्याचे पाहणेही आनंददायक आहे.
युपी योद्धाज आणि तेलगु योद्धाज हे दोन्ही संघ जीएमआर स्पोर्ट्सच्या मालकीचे असून कबड्डी पटूंनी खो खो खेळाचा पुरेपूर आनंद लुटला.
युपी योद्धाज कर्णधार नितेश म्हणाला की, आम्हाला ही मॅटशी जुळवून घेताना काही कालावधी लागला आणि खो खो संघाबाबतीतही तसेच घडले. परंतु या खेळाडूंना पोल डाईव्ह आणि स्काय डाईव्ह मारताना पाहून खूपच आनंद झाला.
नितेश सह यावेळी युपी योद्धाज संघातील त्याचे सहकारी नितीन तोमर, सुरेंदर गिल, आशुसिंग आणि सुमित हेसुद्धा उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading