भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्रीनटेक क्वालिटी अँड इन्नोव्हेशन अवॉर्ड २०२२ मध्ये जिंकले १७ पुरस्कार
मुंबई : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या ‘महारत्न‘ व फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने ‘ग्रीनटेक क्वालिटी अँड इन्नोव्हेशन अवॉर्ड्स‘, ‘ग्रीनटेक एन्व्हायरन्मेंट अँड सीएसआर अवॉर्ड्स‘ मध्ये विविध विभागांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. गुवाहाटी येथे पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यामध्ये उद्योगक्षेत्रातील उत्तमोत्तम कंपन्यांना पिछाडीवर टाकत बीपीसीएलने आघाडी मिळवली आहे.
परिपूर्ण गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णतेच्या क्षेत्रांत लक्षणीय यश संपादन केल्याबद्दल तसेच कार्बन उत्सर्जन कमी करून, पर्यावरण संरक्षणात वाढ करून स्थिरता उद्दिष्ये पूर्ण केल्याबद्दल तसेच आपण जिथे काम करतो, राहतो त्या पर्यावरणाच्या फायद्यासाठी दीर्घकालीन बदल घडवून आणल्याबद्दल हे पुरस्कार बीपीसीएलला प्रदान करण्यात आले आहेत.
आसाम सरकारचे पर्यावरण आणि वने विभागाचे माननीय मंत्री श्री. चंद्र मोहन पटवारी आणि आसाम राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरुप कुमार मिश्रा याच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.
विविध बिझनेस युनिट विभागांमध्ये बीपीसीएलने १७ प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले, यामध्ये आरअँडडी सेंटर, रिटेल, ल्युब्रिकंट्स, मुंबई रिफायनरी, आयएस डिपार्टमेंट आणि क्वालिटी कंट्रोल सेल यांचा समावेश आहे. १७ प्रस्तावित विभागांचाही यामध्ये समावेश होता – प्रॉडक्ट इनोव्हेशनमधील चार विभाग, टेक्नॉलॉजी इनोव्हेशनमधील तीन विभाग, एन्व्हायरन्मेंटल इनोव्हेशनमधील दोन विभाग, प्रोसेस इनोव्हेशनमधील पाच विभाग, पोटेन्शियल इनोव्हेशन आणि एन्व्हायरन्मेंट चॅम्पियन्स.
देशात संशोधन व विकासामध्ये प्रमुख योगदान देत असलेल्या पीएसयुंच्या प्रयत्नांचा सन्मान करणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. विजेत्यांची निवड त्यांच्या उत्पादनाच्या आधारे केली जाते, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यावसायिक सादरीकरणांनाही विचारात घेतले जाते. या दोन्हींमधून ज्युरीना उत्पादन, कंपनी व व्यवसाय योजनांबाबत तपशीलवार, तथ्य व आकडेवारीवर आधारित, अतिशय भक्कम माहिती पुरवली गेली.
हितधारकांच्या अनुषंगाने उत्पादन प्रक्रिया व सेवा प्रदान करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी व त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीनटेक क्वालिटी अँड इनोव्हेशन अवॉर्ड्सची सुरुवात करण्यात आली. क्षेत्रातील लक्षणीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात.
