Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

अफझल खान वध देखाव्याच्या परवानगीसाठी हिंदू महासंघ कोथरूड पोलीस ठाण्यात  

पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील एका गणेश मंडळाला अफजल खान वध हा ऐतिहासिक जिवंत देखाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं कारण देत हा देखावा साकारण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आता या प्रकरणावरुन राज्यभरातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून पुण्यातील मंडळे सुद्धा या निर्णयाविरुद्ध आक्रमक झाले आहेत. आज अफझल खान वधाच्या देखाव्याला परवानगी मिळावी यासाठी हिंदू महासंघ ने कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे.

यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे हिंदू महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. आनंद दवे म्हणाले, संगम तरुण मंडळाचे यंदा 56 वे वर्ष आहे. यावर्षी त्यांनी अफजल खानाचा वध हा जिवंत देखावा सादर करण्याची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी कोथरूड पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली आहे. मात्र कोथरूड पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण देत या मंडळाला हा देखावा साकारण्यास परवानगी नाकारली आहे. केवळ बघत बसायचं आणि social media वर प्रतिक्रिया द्यायच्या हा हिंदू महासंघ चा स्वभाव नाही. या मंडळांना अफझल वधाच्या देखाव्याला परवानगी मिळावी यासाठी आज आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनला निवेदन देत आहोत, असे आनंद दवे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading