Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRA

शिंदे व फडणवीस सरकार हे पैसा आणि ईडी या दोन गोष्टींच्या ताकदीवर सुरु आहे – सुप्रिया सुळे

पुणे : राज्यातील आताचे सरकार हे केवळ पैसा आणि ईडी या दोन गोष्टींच्या ताकदीवर सुरु आहे; अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे व फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.

राज्यात खालच्या थराचे राजकारण सुरु असून यापूर्वीही सत्तेत बदल झाले परंतु आतासारखी वाईट परिस्थिती नव्हती. आता कोण कुठल्या पक्षात आहे. हेच कळेनासे झाले आहे. दोन महिन्यांपासून पालकमंत्री नसल्यामुळे केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. अजूनही सर्वं मंत्री हे सेलिब्रेशनमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचा खोचक टोलाही सुळे यांनी लगावला.

पक्ष फोडून पन्नास कोटी घेण्यापेक्षा ते शेतकऱ्यांना द्यायला हवे होते 

आज दुपारी एका शेतकऱ्यांने मंत्रालय समाेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावर बोलताना सुप्रियासुळे म्हणाल्या, आमची सगळ्यांची अपेक्षा होती महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदत करावी परंतु या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वासच नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यानं टोकाचे पाऊल उचललं असावे. या सगळ्याला हे ईडीचे सरकार जबाबदार असून पक्ष फोडून पन्नास कोटी त्या लोकांच्या घरात जाण्यापेक्षा हे पैसे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले असते तर बरं झालं असतं.
आज मंत्रालय समाेर एका शेतक-यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याबाबत खासदार सुळे यांना हे सरकार शेतक-यांसाठी कमी पडत आहे का असं विचारलं असता त्या म्हणाल्या अडचणीच्या काळातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी स्वतः अजितदादा देखील बोलले होते. आज दादांनी शेतकऱ्यांचा विषय काढला आणि त्यावर चर्चा होणार होती. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading