विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मुदतवाढ
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली असून त्या अंतर्गत विद्यापीठाशी संलग्न सर्व शैक्षणिक विभाग व संशोधन केंद्र यांच्याकडून मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडील रिक्त जागेचा तपशील घेण्यात येत आहे.
संशोधन केंद्रातील मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांकरिता ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेस्थळावर जात http://bcud.unipune.ac.in/root/login.aspx या लिंकवर जात २० ऑगस्ट २०२२ पर्यंत ही माहिती मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शकांनी भरायची होती, मात्र त्यास आता मुदतवाढ देण्यात आली असून मार्गदर्शकांनी ३० ऑगस्ट पर्यंत आपल्या संशोधन केंद्रामार्फत सादर करायची आहे.
ज्या मार्गदर्शकांना शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये विद्यार्थी घ्यायचे नाहीत त्यांनी देखील आपल्याकडे नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती सादर करणे आवश्यक आहे.
मार्गदर्शकांना याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी ०२०- ७१५३३६३३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा phdtracking_support@pun.unipune.ac.in या संकेस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
