या कारणामुळे पुण्यातील विविध भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार
पुणे:देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. पुण्यातील विविध भागांत हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे टाकी परिसर, एस. एन. डी. टी. एचएल आर व एम. एल. आर टाकी परिसर, स्वारगेट पाणीपुरवठा विभाग अखत्यारीतील पर्वती टाकी परिसर तसेच नवीन व जुने होळकर जलकेंद्र, चतु: श्रृंगी टाकी परिसर येथील विद्युत, पंपींग चे काम करण्यात येणार आहे. वारजे जलकेंद्राचे लाईन जोडणे व फ्लो मीटर बसवण्याच्या कामामुळे वरील ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.
कुठल्या भागात पाणी बंद राहणार सविस्तर वाचा
पाषाण साठवण टाकी, भूगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारती नगर, बावधन परिसर, सारथी शिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीवन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, बाणेर, बालेवाडी, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी
कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु. पी. स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरुड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क -1, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मी नगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेड 7 व 9, मुंबई-पुणे बायपास रोड दोन्ही बाजू, शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड, विजयनगर, आंबेडकर नगर, दत्त नगर, इत्यादी.
कर्वेनगर गावठाण परिसर, तपोधाम, सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. 1 ते 11, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॉलनी गल्ली क्र.1 ते 10
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरुड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जय भवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनकवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, SNDT परिसर, कर्वे रोड, युनिव्हरसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनकवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी, इत्यादी.
गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ,
अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, इत्यादी
मुळा रोड, खडकी कॅन्टोन्मेंट संपूर्ण परिसर, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत,
संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंधी सोसायटी, औंध गाव परिसर.
