राज्यात पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा
पुणे: राज्यात पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भापाठोपाठ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, उत्तर कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. विदर्भात विजांसह पावसाची तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दोन दिवसात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे .तर विजांसह पावसाचा इशारा बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात देण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात किरकोळ पाऊस होणार आहे. कोकणात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून तीव्र कमी दाब क्षेत्र ते अग्नेय बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत पाऊस उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहेत. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणात पावसाने दणका दिला आहे. मंगळवारी विदर्भात पाऊस ओसरला होता. तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस वाढल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रात कमी-अधिक स्वरूपात श्रावण सरी कोसळत आहेत. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्य
