सामाजिक बांधिलकी जपत विश्वेश्वर बँकेने साजरा केला स्वातंत्र्य दिन
जनसेवा फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या अकरा मुलांच्या देखभालीसाठी रुपये १,२१,००० इतका निधी प्रदान
पुणे : विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेडतर्फे बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर विनोद शहा संचालित जनसेवा फाऊंडेशनने दत्तक घेतलेल्या अकरा मुलांच्या देखभालीसाठी रुपये १,२१,००० इतका निधी प्रदान केला. १५ ऑगस्ट रोजी 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य आयोजित कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निधी फौंडेशनला सुपूर्द करण्यात आला. जनसेवा फाउंडेशन हे रस्त्यावरील मुलांची काळजी आणि शिक्षण यासाठी काम करते. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष मनोज साखरे, ज्येष्ठ संचालक सुनील रुकारी आणि संचालक मंडळातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनास्कर यांच्या हस्ते ढोल ताशांच्या गजरात अतिशय दिमाखदारपणे ध्वजारोहण करण्यात आले.
