Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समूह राष्ट्रगीताचे गायन

 

पुणे: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

राष्ट्रप्रेमाची भावना सर्वांमध्ये रुजावी यासाठी केंद्र व राज्य शासनाने समूह राष्ट्रगीत गायनाबाबतचा कार्यक्रम आखला होता. यानिमित्त विद्यापीठात यावेळी बुधवारी ठीक अकरा वाजता विद्यापीठाच्या शिक्षक तसेच शिक्षकेतर विभागांमध्ये त्या त्या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी एकत्र येत राष्ट्रगीत गायले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनीही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत समूह राष्ट्रगीत गायन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading