ज्योती मेटे यांना भाजपने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे – अंकुश काकडे
पुणे : शिवसंग्रामचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचे एका अपघातात निधन झाले. त्यामुळे त्यांच कुटुंब हे दुःखात बुडाल आहे. मराठा समाजाची मोठी खानी झाली आहे. याची दाखल घेवून भाजपाने यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना भाजपाने राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.
डॉ.ज्योती मेटे यांना
भा.ज.प.ने राज्यपाल
कोट्यातून विधान
परिषदेवर घ्यावे.— ANKUSH KAKADE (@Kakade_Ankush) August 17, 2022
अंकुश काकडे म्हणाले, विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला संधी मिळण्याची गरज आहे. विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना युतीतील घटक पक्ष आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्यानंतर किमान त्यांच्या पत्नीला तरी संधी द्यावी. अशी मी मागणी आम्ही करत आहोत. विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले. पण त्यांनी कधी स्वतःला मंत्रीपद द्यावे, अशी मागणी केली नाही, असेही अंकुश काकडे म्हणाले.
