Monday, September 7, 2026
Latest NewsPUNE

स्वातंत्र्यदिनी मेट्रो मधून 82 हजारांहून अधिक पुणेकरांचा प्रवास

पुणे: पुणे मेट्रोचे वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक आणि पिंपरी चिंचवड महानगपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक हे विभाग 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर कार्यान्वित करण्यात आले.15 ऑगस्ट, आझादी का अमृत महोस्तव आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने, पुणे मेट्रोने रिच 1 वरील फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि रिच 2 वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो अशी पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.

या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानकातून ते दापोडी मेट्रो स्थानकाकडे मेट्रो त्याच वेळेस धावली. दोन्ही गाड्यांचा ट्रायल रनचा वेग 15 किमी प्रती तास इतका होता आणि तो नियोजनाप्रमाने प्रमाणे पूर्ण झाला.
यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, आम्ही येत्या काही महिन्यांत मेट्रोचे उर्वरित मार्ग उघडण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि रिच 1 मध्ये फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशनपर्यंत आणि रिच 2 मध्ये गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रोपर्यंत पहिली ट्रेन ट्रायल चालवली जाईल. त्यासाठी सुरुवात आजपासून झाली आहे.
पुणे मेट्रोला आज मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा पुणे मेट्रोच्या शिरेपेचात आजुन एक मानाचा तुरा आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने अनेक पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले. पुणे मेट्रोच्या प्रवाशांनी मागील दिवसाचा विक्रम आज मोडला. सायंकाळी 8 वाजेपर्यंत 82 हजारांहून अधिक लोकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. मागील दैनंदिन प्रवासी रेकॉर्ड प्रति दिन 67,280 प्रवासी होते. मोठ्या संख्येने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक गट, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी यांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading