Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

“मी पीएमपीएमएलचा प्रवासी” स्पर्धेतील विजेत्यांना मोफत बस पासचे वितरण

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ व प्रवासी यांचे नाते अधिक घट्ट होणेचे दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या संकल्पनेतून दि. १ जुलै २०२२ ते दि. ३१ जुलै २०२२ या कालावधीतपुणे महानगर परिवहन महामंडळाने "मी पीएमपीएमएलचा प्रवासी" या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते ‘मोफत बस पास’ चे वितरण करण्यात आले.
यावेळी पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक  डॉ. चेतना केरुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रज्ञा पोतदार –
पवार, महाव्यवस्थापक सुबोध मेडसिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पीएमपीएमएलने दि. १ जुलै २०२२ ते दि. ३१ जुलै २०२२ या कालावधीत पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता ;मी पीएमपीएमएलचा प्रवासी या स्पर्धेचे आयोजन केले होते. लेख, कविता, फोटो व व्हिडीओ अशा ४ संवर्गात स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रत्येक संवर्गा करिता अनुक्रमे प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून सर्व मार्गाकरिता१ वर्षाचा मोफत बस पास, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून सर्व मार्गाकरिता ६ महिन्याचा मोफत बस पास व तृतीय क्रमांकाचे बक्षीस म्हणून सर्व मार्गाकरिता ३ महिन्याचा मोफत बस पास असे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने १२४० लेख, ७४० कविता, ६७७ फोटो व २८३ व्हिडीओ प्राप्त झाले होते.

या सहभागी स्पर्धकांमधून संवर्ग निहाय विजेत्या स्पर्धकांना स्वातंत्र्यदिनी पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील मुख्यालय येथे
आयोजित कार्यक्रमात पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे
बक्षीस असलेले ‘मोफत बस पास’ चे वितरण करण्यात आले.
1) उत्कृष्ट लेख

अ.क्र. विजेता क्रमांक मोफत बस पास कालावधी विजेत्याचे नाव
१ प्रथम बक्षीस १ वर्षाचा मोफत पास श्री. ऋषिकेश नारायण घोडके
२ द्वितीय बक्षीस ६ महिन्याचा मोफत पास श्री. प्रतिक गजानन पाटील
३ तृतीय बक्षीस ३ महिन्याचा मोफत पास श्री. रावसाहेब भानुदास खेडकर

ब) उत्कृष्ट कविता

अ.क्र. विजेता क्रमांक मोफत बस पास कालावधी विजेत्याचे नाव
१ प्रथम बक्षीस १ वर्षाचा मोफत पास श्री.यशपाल ज्ञानेश्वर पवार
२ द्वितीय बक्षीस ६ महिन्याचा मोफत पास श्री. आशिष सुरेश पवार
३ तृतीय बक्षीस ३ महिन्याचा मोफत पास कु. वैष्णवी शिवदास भोरसे

क ) उत्कृष्ट फोटो

अ.क्र. विजेता क्रमांक मोफत बस पास कालावधी विजेत्याचे नाव
१ प्रथम बक्षीस १ वर्षाचा मोफत पास श्री. अजय मोहन कांबळे
२ द्वितीय बक्षीस ६ महिन्याचा मोफत पास कु. निशा गायकवाड
३ तृतीय बक्षीस ३ महिन्याचा मोफत पास श्री. अभिजित पांडुरंग पनाळे

ड) उत्कृष्ट व्हिडीओ

अ.क्र. विजेता क्रमांक मोफत बस पास कालावधी विजेत्याचे नाव
१ प्रथम बक्षीस १ वर्षाचा मोफत पास श्रीमती सुरेखा सतीश कुंजीर
२ द्वितीय बक्षीस ६ महिन्याचा मोफत पास श्री. युवराज अशोक फडके
३ तृतीय बक्षीस ३ महिन्याचा मोफत पास श्री. राहुल महादेव सोसे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading