Saturday, May 9, 2026
Latest NewsNATIONALPUNE

एअर इंडियाची पुणे व अहमदाबाद  पहिली थेट विमानसेवा सुरु 

पुणे :  एअर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमान कंपनीने पुणे व अहमदाबाद शहरांदरम्यान आपली पहिली थेट विमानसेवा २० ऑगस्ट २०२२ पासून सुरु करत असल्याची घोषणा आज केली. भारतातील दोन स्मार्ट शहरे आणि वाणिज्यिक व शैक्षणिक केंद्रे म्हणून वेगाने विस्तार पावत असलेल्या पुणे व अहमदाबाद दरम्यान हवाई कनेक्टिव्हिटीची मागणी पूर्ण करण्यासाठी एअर इंडियाने या नव्या मार्गाचा समावेश आपल्या नेटवर्कमध्ये करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाचे विमान ०४८१ अहमदाबाद विमानतळावरून सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी निघून पुणे विमानतळावर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. त्याचप्रमाणे विमान एआय ०४८२ पुणे विमानतळावरून दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी निघून अहमदाबाद विमानतळावर दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. या दोन शहरांदरम्यान हवाई प्रवासाला लागणारा अंदाजे वेळ ८५ ते ९५ मिनिटांचा असेल.

कोविड-१९ महामारी आणि इतर काही कारणांस्तव दीर्घकाळापासून बंद ठेवण्यात आलेले एअर इंडियाचे विमान पुन्हा सेवेत आणण्यात आल्यामुळे पुणे व अहमदाबाद हा नवा मार्ग सुरु करणे शक्य होत आहे.

एअर इंडियाचे एमडी व सीईओ  कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “महाराष्ट्र आणि गुजरातेतील दोन महत्त्वाची प्रगती केंद्रे असलेल्या पुणे व अहमदाबाद दरम्यान विमानसेवेचा शुभारंभ करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  एअर इंडियाच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा घडवून आणणारे आणि आमच्या प्रवाशांना सुविधाजनक प्रवासाचे अजून जास्त पर्याय उपलब्ध करवून देऊन अधिक सक्षम बनवणारे हे पुढचे पाऊल आम्ही उचलत आहोत. येत्या काही महिन्यांमध्ये आमची अजून विमाने सेवेत परत येतील, त्यामुळे आम्ही अजून नवे मार्ग सुरु करून आमच्या देशांतर्गत कनेक्टिव्हिटीमध्ये अजून जास्त वाढ करू शकू.”

एअर इंडियाच्या नॅरोबॉडी ताफ्यामध्ये सध्या ७० एअरक्राफ्ट्स असून त्यापैकी ५४ सध्या सेवा देण्यायोग्य सक्षम आहेत. उर्वरित १६ एअरक्राफ्ट्स २०२३ च्या सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत टप्प्याटप्प्याने सेवेत येतील.

२० ऑगस्ट २०२२ पासून अहमदाबादपुणे शेड्युल

फ्लाईट डिजाईन विमान इथून निघणार विमान निघण्याची वेळ विमान इथे पोहोचणार विमान पोहोचण्याची वेळ प्रकार
एआय  0४८१ अहमदाबाद १०:४५ पुणे १२,१० नवीन

२० ऑगस्ट २०२२ पासून पुणेअहमदाबाद शेड्युल

फ्लाईट डिजाईन विमान इथून निघणार विमान निघण्याची वेळ विमान इथे पोहोचणार विमान पोहोचण्याची वेळ प्रकार
एआय   0४८२ पुणे १२:४0 अहमदाबाद १४:१५ नवीन

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading