Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘गोंदिया निर्भया’ प्रकरणात चित्रा वाघ यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले – सुषमा अंधारे

पुणे : महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे अस्तित्वात आलेले नवे सरकार सत्तेसाठी लढाई करत असताना. राज्यात महिलांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या गंभीर घटना घडत आहेत. मागील चाळीस दिवसापासून राज्याला गृहमंत्री नाही. महिला बाल विकास मंत्री नाही. अशातच भंडारा गोंदिया येथे सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली. त्यावर भंडारा गोंदिया प्रकरणात भाजपाचा पीडित महिलेच्या कुटुंबावर दबाव असून शिवसेना पक्षाकडून देण्यात येणारी मदत स्वीकारू नये, असे बजावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. तसेच या अत्यंत गंभीर प्रकारांकडे भापच्या नेत्या चित्रा वाघ यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची टीका ही त्यांनी केली आहे.

या पत्रकार परिषदेला गजानन थरकुडे, संजना घाडी आदी उपस्थित होते.

शिवसेना समिती सदस्यांच्या मागण्या

  • या प्रकरणाची एस आय टी चौकटी ४५ दिवसात पूर्ण होऊन खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
  • राज्य शासनाने या पीडित कुटुंबाला मनो धैर्य योजनेची दोन लाख रुपये व शासकीय आर्थिक मदत त्वरित द्यावी.
  • या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या व तपास यंत्रणेत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे.
  • मनोधैर्य योजनेच्या नावाखाली केवळ तीस हजार रुपयांची मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे.
  • या प्रकरणाची महिला आयोगाने व मानवी हक्क आयोगाने तातडीने दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस द्यावेत आणि या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून जबाबदार असणाऱ्या लोकांना आरोपी करावे.
  • उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या शक्ती कायद्याला केंद्र सरकारने तातडीने मान्यता द्यावी.
  • राज्याच्या राज्यपालांनी या केसची दखल घेऊन राज्य सरकारला उत्तर मागवावे.
  • पोलीस महासंचालक व पोलीस विभाग यांच्याकडून तातडीने अहवाल घेऊन सरकारला या पिढीत कुटुंबाला न्याय देण्यासाठी आदेश द्यावेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading