संजय राठोड यांच्या शपथविधीनंतर चित्रा वाघ नाराज भाजपाला दिला घरचा आहेर
मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला आहे. यावेळी 18 आमदारांचा शपथविधी झाला. यामध्ये बंडखोर आमदार संजय राठोड यांनीही शपथ घेतली. परंतु, यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारला घरचा आहेर दिला आहे.
संजय राठोड हे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. यादरम्यान पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी त्यांचे नाव समोर आले होते. यावेळी भाजपने त्यांच्याविरोधात रान पेटवले होते. यामुळे त्यांना आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु, आता शिंदे सरकारमध्ये पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली आहे. यावर चित्रा वाघ यांनी नाराजी दर्शवली असून शिंदे-भाजप सरकारवर टीका केली आहे.
पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्यांच्याविरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे, जितेंगे, असे चित्रा वाघ यांनी पत्रकारांची बातचीत करताना म्हटले आहे.
