प्रा .एम.जी. धडफळे दुसरे स्मृती व्याख्यान १० ऑगस्ट रोजी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली आणि बौद्ध अध्ययन विभागातर्फे प्रा.एम.जी. धडफळे दुसरे स्मृती व्याख्यान ‘देशना इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिस्ट अँड ॲलाइड स्टडीज’ यांच्या सहकार्याने १० ऑगस्ट रोजी विभागात ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे.
‘व्हेन द फ्युचर शाक्यमुनी बुद्ध मेट दिपंकर बुद्ध’ या विषयावर विभागातील संलग्न प्राध्यापक प्रा. अँडी रोटमन गांधार साहित्य व कला या अनुषंगाने हे व्याख्यान देणार आहेत. रोटमन हे इंडोलॉजी क्षेत्रातील अभ्यासक असून प्रा.एम.जी.धडफळे यांचे माजी विद्यार्थी आहेत. सध्या ते अमेरिकेतील स्मिथ कॉलेज येथे सिडनेहॅम क्लार्क पार्सन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
याच कार्यक्रमात पाली भाषेतील ललित लेखनाकरिता दिल्या जाणाऱ्या ‘प्रा. एम. जी. धडफळे उत्कृष्टता पुरस्कारा’ची घोषणा देखील करण्यात येणार आहे. दहा हजार रुपये रोख व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून धडफळे कुटुंबियांनी पाली भाषेतील ललित लेखनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने २०२१ पासून पाली व बौद्ध अध्ययन विभागाच्या माध्यमातून सदर पुरस्काराची सुरुवात केली आहे. कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी विभागातर्फे पुढील लिंक देण्यात आली आहे. https://teams.microsoft.com/l/meetup-join/19%3a8e939654896f4905b5bde847cced55c9%40thread.tacv2/1659429673319?context=%7b%22Tid%22%3a%2255a25e16-7e18-4926-b6b0-873b7d310255%22%2c%22Oid%22%3a%22eb1be866-1630-4c51-b2c5-5096d6e55a06%22%7d
