नवीन प्रभाग रचना स्वागतार्ह – जगदीश मुळीक
पुणे : महविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे महापालिकेची सदस्य संख्या वाढवली होती. वास्तविक जनगणना पूर्ण झाल्यानंतर त्या प्रमाणात सदस्य संख्या वाढविणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीने चुकीचा निर्णय घेतला. प्रभागातील सदस्य संख्या तीन केली. नैसर्गिक सीमांचा विचार न करता अनिर्बंध पद्धतीने प्रभाग रचना केल्या. सत्तेचा दुरुपयोग केला. त्यामुळे अनेक होतकरू राजकीय कार्यकर्त्याची निवडणूक लढविण्याची संधी गमवावी लागली असती. आता भाजप सेनेच्या सरकारने पुन्हा चारचा प्रभाग केला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. भौगोलिक सलगतेमुळे सर्वांना समान संधी मिळेल. भाजपचे महापलिकेतील संख्या बळ वाढून ते ११० च्या पुढे जाईल असा विश्वास वाटतो.
