Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

राधिका – विक्रांत झळकणार ‘फॉरेन्सिक’मध्ये

सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेल्या ‘फॉरेन्सिक’ या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रीमेक तयार होत आहे. यामध्ये अभिनेत्री राधिका आपटे आणि अभिनेता विक्रांत मेस्सी हे एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या सस्पेन्स क्राइम थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पुरिया यांनी केले आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट झाला आहे. तरुण मुलींचा खून करणाऱ्या सिरीयल किलरचा फॉरेन्सिक टीमनं घेतलेला शोध असे या चित्रपटाचे मध्यवर्ती कथानक आहे. चित्रपट विविध सत्य घटनांवर आधारित आहे. विक्रांत या चित्रपटामध्ये फॉरेन्सिक अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. विक्रांत आणि विशाल यांनी यापूर्वी ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसीरिज मध्ये एकत्र काम केले आहे. ‘फॉरेन्सिक’ हा मूळ चित्रपट युट्युबवर देखील उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading