fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

गौरव घुले यांच्यातर्फे रिक्षा चालकांना मोफत कुपन वाटप

पुणे: महेश सोसायटीचे चेअरमन व युवा नेतृत्व गौरव घुले यांच्यातर्फे आज रिक्षाचालकांना मोफत कुपन वाटप करण्यात आले. महेश सोसायटी येथील दत्त मंदिरात हा कार्यक्रम पार पडला.
महेश सोसायटी चौकातील व अप्पर ओटा येथील रिक्षाचालकांना मोफत कुपन वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजित पवार, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील घाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वाफगावकर व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी रिक्षाचालकांनी गौरव घुले यांचा सत्कार केला.

यावेळी गौरव घुले म्हणाले मी मागच्या वेळी धनकवडी येथील सीएनजी पेट्रोल पंपावर
धनकवडी व अप्पर भागातील रिक्षाचालकांना कुपन वाटप केले होते मला कोरोनामुळे जे रिक्षाचालकांना आर्थिक समस्येला तोंड जे द्यावे लागत आहे ते मला बघवत नाही .म्हणून मी सामाजिक कार्य हे चालू ठेवायचे असे ठरवले.
आज मी आमच्या प्रभागातील रिक्षाचालकांना कुपन वाटप केले आहे हेच कार्य मी चालू ठेवणार आहे व पुढच्या वेळी स्वारगेट भागातील रिक्षाचालकांना कुपन वाटप करणार आहे.

आनंद पाटील रिक्षा चालक म्हणाले आमच्या प्रभागातील युवा नेतृत्व गौरव घुले यांनी आज आम्हा रिक्षावाल्यांना मोफत कुपन वाटप केले.
गौरव घुले यांनी आज मला स्वतःहा येऊन सांगितले काका आज मी तुम्हाला मोफत पण वाटणार आहे तुम्ही पण या आणि सगळ्या रिक्षावाल्याना सांगा कोरोनाच्या काळात गरजू लोकांना मदत करणारे फार थोडीच लोक असतात त्यातील गौरव घुले हे आहेत आज आम्ही भरपूर आनंदी आहोत आम्हा रिक्षा वाल्यांची एक महिन्याची तरी पेट्रोल व सीएनजीची सोय झाली..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading