मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

नवी दिल्ली – मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना आणि कोरोना संकटात जनता होरपळत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘पंतप्रधानांसोबत व्यवस्थित चर्चा झाली असून राज्याचे जे प्रमुख विषय आहेत ते आम्ही अत्यंत समजूतदारपणे आणि शांतपणे त्यांच्यासमोर मांडले, प्रत्येक विषयाचे विस्तृत पत्रक त्यांना दिले आणि त्यांनी सर्व विषय गांभीर्याने ऐकून घेतले असून मी माहिती घेतो आणि लक्ष देतो असे सांगितले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पंतप्रधानांसमोर कोणते विषय मांडले, हेदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मांडलेले राज्याचे विषय
– मराठा आरक्षण
– इतर मागासवर्गीयांचे पंचायतराज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
– मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण
– मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागेची उपलब्धता
– जीएसटीचं येणं हे वेळेवर येणं
– पीक विमा
– राज्यांमध्ये पाल.. स्पर्धात्मक
– गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत. मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे आवश्यक आहे.
– NDRF चे निकष बदलणे आवश्यक
– १४व्या वित्त आयोगातील थकीत निधी
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

Leave a Reply

%d bloggers like this: