Saturday, June 13, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज 69 हजार 710 रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई, दि. 30 – महाराष्ट्रात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे राज्याला एक दिलासा मिळाला आहे. कोरोना बाधितांच्या वाढीलाही ब्रेक लागला आहे. मात्र, असे असले तरी दैनंदिन रुग्ण संख्या ही 62 हजारांहून अधिकच आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूमुळेही चिंता वाढत आहे.

आज महाराष्ट्रात 69710 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 38,68,976 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.06 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,71,06,282 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,02,472 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 41,93,868 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,462 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे शहर कोरोना अपडेट्स
.
– दिवसभरात ४११९ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ५०१३ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ८७ रुग्णांचा मृत्यू. २५ रूग्ण पुण्याबाहेरील.
– १३९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४१९५१८.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४३२४४.
– एकूण मृत्यू -६७९७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३६९४७७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९५३७.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading