Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज पॉझिटिव्ह पेक्षा कोरोना मुक्त रुग्ण अधिक

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच आज सकारात्मक माहिती समोर आली आहे. कारण आज बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज ६६ हजार ८३६ नव्या बाधितांची नोंद झाली असून ७४ हजार ०४५ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, गेल्या २४ तासांत ७७३ मृतांची नोंद झाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यातच, मृतांच्या आकड्यातही वाढ होत होती. दरम्यान, आज बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. रुग्ण वेगाने बरे होत गेल्यास राज्यातील बेड्सची आणि इतर वैद्यकीय सुविधांची वाणवा थांबणार आहे. गेल्या २४ तासांत आज ६६ हजार ८३६ रुग्णांची वाढ झाली आहे, तर ७४ हजार ०४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा ४१ लाख ६१ हजार ६७६ झाली आहे. यापैकी ३४ लाख ४ हजार ७९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे ६३ हजार २५२ रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तर सध्या ६ लाख ९१ हजार ८५१ रुग्णांवर राज्यात उपचार सुरू आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात ४४६५ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ५६३४ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ८० रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३२८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३९१४९५.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५०३२५.
  • एकूण मृत्यू -६३८८.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३३४७८२.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२९६२.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading