Saturday, May 30, 2026
TECHNOLOGY

जगभरात ट्विटर सर्व्हर डाऊन

नवी दिल्ली – मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेली साईट ट्विटर (Twitter) आज जगभरात डाऊन झाली होती. तांत्रिक बिघाड उद्भवल्याने युजर्सना ट्विटरच्या वापरात अडचणी येत होत्या. सकाळपासून काही ठिकाणी ट्विट सेवेत अडचणी येत होत्या, तर सायंकाळी पूर्णपणे ठप्पच झाली होती. मात्र काही काळानंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली.

ट्विटरला सकाळपासूनच तांत्रिक अडचणी येत होत्या. रिफ्रेश केल्यानंतर थेट लॉग इन पेजवर नेण्यात येत होतं. शिवाय स्क्रिन सतत ब्लिंकही होत होती. हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला हे शोधण्यासाठी लोक गुगल सर्च करत होते. मात्र काही वेळाने ट्विटर पुन्हा सुरळीत झाले. या प्रकारानंतर कंपनीने अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. ट्विटरही मायक्रो ब्लॉगिंगमध्ये सर्वात लोकप्रिय साईट आहे. ट्विटरचे युजर्स कोटींनी आहेत. मात्र, ट्विटरला लॉगिनसाठी अडचणी आल्यामुळे अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे काही क्षणात ट्विटर डाऊन (#TwitterDown) हा हॅशटॅग ट्रेंडिगवर आला होता.

याआधीसुद्धा ट्विटर बंद

याआधीसुद्धा 29 मार्च सकाळी साधारण 10.30 पासून ट्विटर वापरण्यास अचानकपणे अडचणी येत होत्या. त्यानंतर काही क्षणांत जगभरातून #twitter down हा हॅशटॅग ट्रेंडींगला आला होता. अनेकांनी ट्विट, रिट्विट तसेच मिडीया अ‌ॅक्सेस करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याची तक्रार केली होती. अमेरिका, ब्रिटनसारख्या मोठ्या देशांमध्या ही अडचण पाहायला मिळाली होती. त्यानंतर तब्बल एका तासानंतर ट्विटर पुन्हा सुरळीत झाले होते. एका रिपोर्टनुसार 16000 पेक्षा जास्त युजर्स या अडचणीने प्रभावित झाले होते. त्यानंतर आज पुन्हा जागतिक स्तरावर ट्विटर वापरकर्त्यांना पुन्हा अडचणी येत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading