Saturday, May 30, 2026
PUNE

शाहिरांनी महाराष्ट्रातील परंपरा उज्वलतेकडे नेल्या — प्रभाकर ओव्हाळ

पुणे : शाहीर हा कला, संगीताचा भोक्ता असतो. शाहिरांनी आपला इतिहास लोकांसमोर शाहिरीतून मांडला. समाजमन व समाज विकासासाठी शाहिरीतून काम केले. शाहिरी परंपरा ही मावळे कुटुंबासह काही कुटुंबांनी सुरु ठेवली आहे. त्यामुळे शाहिरांनी ख-या अर्थाने महाराष्ट्रातील परंपरा उज्वलतेकडे नेल्या आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शाहिरीचे अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी व्यक्त केले. 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित पोवाडा प्रशिक्षण आॅनलाईन वर्गाचे उद््घाटन प्रभाकर ओव्हाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, वर्गप्रमुख शाहीर होनराज मावळे आदी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गात होनराज मावळे, मुकुंद कोंडे, हर्ष येळापूरे हे दररोज साथसंगत करणार आहेत. 
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पोवाडा प्रशिक्षण वर्गाचे यंदाचे २४ वे वर्ष असून दिनांक १ जून पर्यंत हा वर्ग आॅनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे. हा वर्ग विनाशुल्क आहे. कथाकथनातून जेव्हा इतिहास समोर येतो, तेव्हा तो इतिहास जीवंत होतो. इतिहास व आपली परंपरा समाजापर्यंत पोहचविण्याचे काम शाहिरीच्या माध्यमातून केले जाते व ही परंपरा पुढे नेण्याचे काम प्रबोधिनीतर्फे करण्यात येत आहे. संगीत हे माध्यम लोकांना जोडण्याचे काम करते. अशा संगीताची परंपरा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याकरीता आमचा हा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading