Tuesday, June 16, 2026
PUNE

कोरोनामुळे अडचणीत असणाऱ्या गरजू लोकांना मदत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पुणे – करोना मुळे नुकतेच एका वृत्तवाहिनीमध्ये तमाशा कलावंतांची गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली व्यथा दाखवण्यात आली होती .ती कलाकारांची अवस्था पाहून सर्वच मराठी माणसांना ती अस्वस्थता पाहून मनोमन दुःख झाले होते. त्यामुळे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे देखरेख समिती सदस्य अतुल बहुले व फुरसुंगी चे माजी सरपंच आप्पा कसबे यांनी तमाशासम्राज्ञी लोककलावंत मंगलाताई बनसोडे यांची त्याच्या गावी जावून भेट घेतली व कलावंतासाठी मदत म्हणून रोख रक्कम २१ हजार रुपयांची वैयक्तीक पातळीवर मदत केली.


त्यावेळी अतुल बहुले यांनी महाराष्ट्रातील लोककला टिकवण्यासाठी व कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाने ही पुढे यावे असे अवाहन केले. वगनाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या तमाशा कलावंतांना आत्ता खरी मदतीची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
या वर्षी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यावर मर्यादा आल्या आहेत कोरोना महामारीमुळे मर्यादा आल्या आहेत त्यामुळे जयंतीवर होणारा खर्च मदत म्हणून समाजातील गरजू घटकांना करावा असे अवाहन यावेळी केले .
तसेच एप्रिल व मे महीन्यामध्ये महाराष्ट्रा मध्ये ज्या- ज्या गावाच्या जत्रा आहेत अशा गावच्या उत्सव कमेट्यांनी या तमाशा कलावंताना जत्रा होवू न होवू सढळ हताने वस्तूरुपी व पैसे रुपी मदत करण्याचे आवाहन केले .
कारण ही कला महाराष्ट्राची पारंपारिक कला आहे. ही कला महाराष्ट्राची ओळख आहे. समाज प्रबोधनाचे साधन आहे.
ही कला व कलावंत जीवंत रहावी यासाठी शासनाने मदत करण्याची गरज असल्याचे मत यावेळी अतुल बहुले यांनी माडले. यावेळी वंचित आघाडीचे नेते अतुल बहुले ,फुरसुंगी गावचे माजी सरपंच आप्पा कसबे यांच्या हस्ते मंगलाताई बनसोडे व नितीन बनसोडे यांना आर्थिक साह्यय रोख स्वरूपात देण्यात आले .यावेळी मुक्त पत्रकार विशाल लोखंडे , विजय भुजबळ उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading