आयटीएलने सोलिस हायब्रिड ५०१५ ट्रॅक्टर बाजारात दाखल
पुणे, दि. 14 – ट्रॅक्टर उद्योगात अद्ययावत तंत्रज्ञान आणण्याच्या दिशेने मोठी झेप घेत इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेड ( आयटीएल ) ने प्रगत सोलिस हायब्रिड ५०१५ हा जपानी तंत्रज्ञानाने तयार झालेला ट्रॅक्टर अवघ्या ७. २१ लाख रु. किमतीला बाजारात आणला आहे. ही किंमत भारतभर कोठेही एक्स शो रूम या तत्वावर आहे. भारतातील सर्वात वेगाने प्रगती करीत असलेली ट्रॅक्टर उत्पादक आणि पहिल्या क्रमांकाचा एक्स्पोर्ट ब्रँड असलेल्या . आयटीएल ने यानमार ऍग्रीबिझनेस या जपानी कंपनीच्या भागीदारीत हा तंत्रज्ञानातील चमत्कार ठरेल असा, तीन ट्रॅक्टर चे फायदे देणारा ट्रॅक्टर विकसित केला आहे.
आयटीएल ही इ पॉवरबूस्ट हे जपानी तंत्रज्ञान भारतात आणणारी पहिली ट्रॅक्टर उत्पादक ठरली आहे. सॉलिस यानमार श्रेणीतील या ट्रॅक्टर चे तंत्रज्ञानाचे स्वामित्व हक्क (पेटंट) कंपनीने घेतले आहेत. हा ट्रॅक्टर लॉंच करून आता आयटीएल सॉलिस यानमार चे फोर व्हील ड्राइव्ह मधील सर्वोच्च स्थान पक्के करीत आहे.
नवीन सोलिस हायब्रिड ५०१५ हा ५० हॉर्स पॉवर चा ट्रॅक्टर पारंपरिक डिझेल इंजिन आणि वीज यांची शक्ती एकवटून ६० हॉर्स पॉवर च्या ट्रॅक्टर ची कामगिरी करून दाखविण्यासाठी सज्ज आहे. या भविष्यवेधी ट्रॅक्टर चे हेवी ड्यूटी मायलेज इंजिन इंधन मात्र ४५ हॉर्स पॉवर ट्रॅक्टर च्या इंजिन एवढे खर्च करते आणि इंधन खर्च वाचवते.
डॅश बोर्ड वरचा पॉवर बूस्टर स्विच आणि हॅन्ड लिव्हर वापरून शेतकरी अगदी सहजपणे ट्रॅक्टर ला अधिक शक्ती मिळवून देत त्याचे काम उंचावू शकतो. प्रगत वेहिकल कंट्रोल ऊर्जा वापरावर देखरेख करतो आणि शक्तिशाली मोटर मुळे ट्रॅक्टर ला चटकन गती पकडता येते. पॉवर बूस्टर मुळे सोलिस हायब्रिड ५०१५ ट्रॅक्टर त्याच्या हा त्याच्या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आणि अजोड कामगिरी करणारा ट्रॅक्टर बनला आहे.
कंपनीच्या या परिवर्तनशील प्रवासाबद्दल आयटीएलचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले, प्रगत देशात उपलब्ध असलेले नव्या युगाचे तंत्रज्ञान भारतातील शेतक-यांना किफायतशीर किमतीला उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तीन ट्रॅक्टर ची कामगिरी करणारा सोलिस हायब्रिड ५०१५ ट्रॅक्टर सादर करून आम्ही या उद्योगात नवा मानदंड स्थापन केला आहे. हायब्रिड ट्रॅक्टर मध्ये असलेल्या लिथिअम इऑन बॅटरी आणि प्रगत मोटर यांमुळे प्रदूषण कमी होते आणि शेतक-याला उत्तम उत्पादकतेचा आत्मविश्वास मिळतो. हाय व्होल्टेज ट्रॅक्टर बॅटरी साध्या घरगुती वापराच्या १६ए सॉकेट प्लग ने ३ तासात पूर्ण चार्ज करता येते. या वैशिष्ट्यांमुळेच हा ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टर चे फायदे देतो.
सोलिस हायब्रिड ५०१५ या फोर व्हील ड्राइव्ह तंत्रज्ञानातील अग्रणी जपानी कंपनी यानमार यांच्या ट्रॅक्टर मध्ये लिथिअम इऑन बॅटरी चा वापर केला आहे. यामुळे सिन्क्रो -कंट्रोलर च्या मदतीने सतत वीज उपलब्ध होते आणि कसलीही देखभाल करावी लागत नाही. या नव्या ट्रॅक्टर मध्ये ऑटो चार्जिंग कट ऑफ आणि चार्जिंग ऑन द गो ची सोय असल्याने बॅटरी चे आयुष्य वाढते. सोलिस हायब्रिड ५०१५ मधील स्मार्ट एलइडी डिस्प्ले मुळे बॅटरी मध्ये किती चार्ज शिल्लक आहे हे दिसते.
