एशियन पेंट्सचा फर्निशिंग क्षेत्रामध्ये प्रवेश
पुणे- वर्ष २०२० ने आपल्या सर्वांना एक गोष्ट करण्यास भाग पाडले, ती म्हणजे आपण सर्वांनी घरीच अधिक वेळ व्यतित केला. ज्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या घराच्या सजावटीमध्ये आकर्षक सुधारणा करण्याचा विचार केला आणि त्यांनी या गोष्टीला नेहमीपेक्षा अधिक प्राधान्य दिले. होम फर्निशिंगने नेहमीच जलदपणे घराच्या सजावटीमध्ये आकर्षक बदल करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विभागातील ही वाढती मागणी लक्षात घेत एशियन पेंटसने ब्रॅण्ड निलाया अंतर्गत डिझाइनर होम फर्निशिंग्सची अद्वितीय श्रेणी सादर करण्यासाठी भारताचे सर्वात सुप्रसिद्ध डिझाइनर सब्यासाचीसोबतचा सहयोग अधिक दृढ केला.
सब्यासाची यांचे कौशल्ये विविध अनुभवांमधील त्यांच्या पहिल्याच होम फर्निशिंग कलेक्शनमधून दिसून येतात. या कलेक्शनमध्ये कोरोमंडल कोस्टमधून कुशलपूर्वक प्रिंट केलेले फॅब्रिक्स, प्राचीन विश्वामधील भरतकाम, प्राचीन कलकत्तामधील फेडिंग लक्झरी आणि मुर्शीदाबाद युगामधील लघुचित्रकारांची परंपरा यांचा समावेश आहे. याचा परिणाम परिवर्तनाच्या असमामान्य व संस्मरणीय प्रवासामधून दिसून येतो, जो पाच आकर्षक कलेक्शन्समधून सत्यात आणण्यात आला आहे – थर, मखमल, सूफा, हजारीबाग आणि चौक.
एशियन पेंट्सने होम फर्निशिंग क्षेत्रामधील त्यांची उपस्थिती अधिक दृढ करण्यासाठी आघाडीचा प्रिमिअम फर्निशिंग ब्रॅण्ड दि प्युअर कन्सेप्टसोबत देखील सहयोग केला आहे. चान्या कौर व दलबीर सिंग यांनी २०१२ मध्ये संयुक्तपणे स्थापना केलेला ब्रॅण्ड दि प्युअर कन्सेप्टने घरांसाठी त्यांच्या अद्वितीय फर्निशिंग फॅब्रिक्समधील महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून दर्जा व सर्जनशीलतेसह जागतिक स्तरावर यशस्वी ब्रॅण्ड म्हणून टप्पा गाठलेला आहे. या सहयोगाचा भाग म्हणून दोन्ही ब्रॅण्ड्स – प्युअर फाइन फर्निशिंग आणि दि प्युअर कन्सेप्ट यांच्या अनुक्रमे रॉयल व निलायासह एकसमान होण्यासाठी त्यांच्या ब्रॅण्डमध्ये सुधारणा करत आहेत. या सहयोगाच्या माध्यमातून एशियन पेंट्स या श्रेणींची संपूर्ण विक्री व विपणनाचे व्यवस्थापन करेल, तर दि प्युअर कन्सेप्ट डिझाइन व उत्पादनावर लक्ष केंद्रित करेल.
तसेच, एशियन पेंट्सने वाजवी दराबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांसाठी त्यांच्या फॅब्रिक्सच्या अडोर श्रेणीअंतर्गत आधुनिक व समकालीन उत्पादनांचे कलेक्शन देखील सादर केले आहे.
या नवीन सादरीकरणासह एशियन पेंट्स डिझाइनर वॉलपेपर्स, पेंट्स, किचन व बाथ कंपनीवरून एकीकृत होम डेकोर कंपनी बनण्याच्या दिशेने प्रयत्न करते.
हे नवीन सादरीकरण आणि दि प्युअर कन्सेप्टसोबतच्या सहयोगाबाबत बोलताना एशियन पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंगले म्हणाले, ”एशियन पेंट्स नेहमीच भिंतीवरील रंगकामासाठी लागणा-या पेंट्ससंदर्भात अग्रस्थानी राहिली आहे आणि भिंतीवरील रंगकाम क्षेत्रामध्ये, तसेच घरामध्ये विशेष स्थान मिळवण्याप्रती काम करत आली आहे. यासंदर्भात आम्ही मागील सहा महिन्यांमध्ये फर्निचर, फर्निशिंग्स व डेकोरेटिव्ह लाइट्सची स्वत:ची श्रेणी सादर केली होती. आमची ग्राहकांना त्यांच्या विविध डिझाइन आवडींना साजेशा अशा फर्निशिंग्सच्या श्रेणीच्या माध्यमातून त्यांचे स्वप्नवत घर सत्यात अवतरण्यामध्ये मदत करण्याची, तसेच ग्राहकांना विविध पर्याय देण्याची इच्छा होती.
दि प्युअर कन्सेप्टसोबतचा सहयोग आम्हाला या उत्तम ब्रॅण्डप्रमाणे डिझाइन व क्वॉलिटी मानके आकर्षक करण्याची संधी देतो. आमचा या विभागामध्ये लक्षणीय उपस्थिती निर्माण करण्याचा मनसुबा आहे. आम्हाला क्लासिकल, पण चिरंतन असलेल्या डिझाइन्ससह नवीन सुविधा सादर करण्यासाठी सब्यसाचीसोबतचा आमचा सहयोग कायम राखण्याचा आनंद होत आहे. यासह आमच्याकडे आता या विभागामधील विविध उत्पादने आहेत, तसेच एशियन पेंट्ससोबत दर्जेदार व विश्वसनीय सहयोग आहे.”
