Saturday, May 30, 2026
MAHARASHTRA

राज ठाकरेंच्या पाठीवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. टेनिस खेळताना राज ठाकरे यांना हाताला झालेल्या दुखापतीवेळी पाठीला देखील त्रास झाला होता. त्यामुळे पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उद्या राज ठाकरेंना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांना सकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुपारी ३ च्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरेंच्या कंबरेचा स्नायू दुखावला गेला होता. त्यामुळे त्यांना बसण्यास त्रास जाणवत होता. उपचारासाठी राज ठाकरे यांनी ३ दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात MRI चाचणी केली होती. आज त्या स्नायूवर छोटी शत्रक्रिया करण्यात येणार होती. फार गंभीर बाब नाही आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले जाणार आहे.

दरम्यान, आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची सर्वपक्षिय बैठक आहे. या बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहणार होते. मात्र, शस्त्रक्रियेमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading