Saturday, May 30, 2026
PUNE

‘एक हात मदतीचा, वसा माणुसकीचा’ उपक्रमाला प्रारंभ

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे समाजातील प्रत्येक घटक अडचणीत आला आहे. त्यामुळे या घटकांना मदतीचा हात देण्यासोबतच माणुसकीचा वसा जपण्याचा प्रयत्न पतित पावन संघटना पुणे शहर करीत आहे. नुकतेच संघटनेचे पुणे शहर प्रवक्ते स्वप्नील नाईक यांच्या पुढाकाराने गुरुवार पेठेतील मोहम्मद रज्जाक उमराणी उर्फ बाबु भाई यांना व्हिलचेअर देऊन उपक्रमाला प्रारंभ झाला. 

पतित पावन संघटना पुणे शहर तर्फे एक हात मदतीचा, वसा माणुसकीचा उपक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी पतित पावनचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, प्रवक्ते स्वप्नील नाईक, विश्वास मनेरे, योगेश वाडेकर, कुमार प्लंजर, यादव पुजारी, गणेश खानापुरे व पराग नाईक हे उपस्थित होते.

स्वप्नील नाईक म्हणाले, शहराच्या पूर्व भागामध्ये हिंदू-मुस्लिम बांधव तसेच विविध समाजाचे नागरिक राहतात. त्यांच्यामध्ये एकोपा रहावा आणि कोरोनाच्या संकटकाळात सर्वांनी एकत्रितपणे एकमेकांसाठी उभे रहावे, याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भविष्यात देखील समाजातील गरजूंना वस्तुरुपी मदतीचा हात देण्याकरीता आम्ही सज्ज आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading