Saturday, May 30, 2026
MAHARASHTRATOP NEWS

MPSC परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आली; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई, दि. 9 – राज्यात पुन्हा एकदा एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 एप्रिलला परीक्षा होणार होती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. विद्यार्थी, विविध नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा बैठकला उपस्थित होते. आजची मंत्रिमंडळ बैठक केवळ एमपीएससी परीक्षेबाबत बोलावण्यात आली होती.

शालेय परीक्षांबाबत काय निर्णय होईल, याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, आज दहावी, बारावी परीक्षेबाबत नाही, तर एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा झाली. बैठक ऑनलाइन झाली असून यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते. ११ एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून वारंवार करण्यात येत होती.

निर्णय घेण्यात आला आहे. 11 एप्रिलला परीक्षा होणार होती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह इतर नेत्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील हेसुद्धा बैठकला उपस्थित होते. आजची मंत्रिमंडळ बैठक केवळ एमपीएससी परीक्षेबाबत बोलावण्यात आली होती.

शालेय परीक्षांबाबत काय निर्णय होईल, याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, आज दहावी, बारावी परीक्षेबाबत नाही, तर एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा झाली. बैठक ऑनलाइन झाली असून यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते. ११ एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून वारंवार करण्यात येत होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading